Posts

Showing posts from April, 2020

हल्दीघाटीची लढाई

हल्दीघाटीची लढाई किती लोकांना माहितीय ? मला वाटतंय जवळपास सर्वांनाच माहितीय.. पण मी जी आज हल्दीघाटीची लढाई सांगणारे ती आहे रिसर्च फिल्डमधील. आणि एका मराठी माणसाने दिलेल्या यशस्वी लढाईची. दुसरा किस्सा बौध्दिक संपदेचा... काळ होता १९९४-९५ च्या सुमारचा. आपल्या देशात नुकतीच बौद्धिक संपदा म्हणजेच Intellectual Property च्या संदर्भात थोडासा अवेअरनेस येऊ लागलेला. आणि त्यावेळीच १९९५ साली अमेरिकेत एक पेटंट ग्रांट झाल , संशोधक म्हणून भारतीय-अमेरिकन व्यक्ती डॉ. सुमन कोहली आणि हरिहर पी. यांनी फाईल केलेल्या पेटंट application ला मान्यता मिळून ते ग्रांट झालेलं. आता पेटंट ग्रांट झाल्यावर काही exclusive हक्क मिळतात ते एकदा पाहू आणि मग पुढे सरकू. एखाद्याला पेटंट मिळाल म्हणजेच ग्रांट झालं की त्याला मुख्यत्वे काही अधिकार मिळतात. एक म्हणजे त्या संशोधनाचा वापर कुणाला करून द्यायचा आणि कुणाला करून नाही द्यायचा यावर सर्वस्वी त्या संशोधकाचा अधिकार राहतो आणि दुसरं म्हणजे तो संशोधक हे संशोधन वापरण्यासाठी परवानगी देणे , त्याचे license देणे , त्याबाबतचे प्रोडक्शन करणे आणि ते विकणे किंवा त्यासंदर...

नोवार्टीस Glivec चा बौद्धिक संपदेचा किस्सा

Image
सध्या कोरोनामुळे फार्मा सेक्टर चर्चेत आहे म्हणून त्या आणि माझ्या म्हणजेच पेटंट संदर्भातला एक केस स्टडी सांगतो. नोवार्तीस, जगातील खूप मोठी फार्मा कंपनी. स्वित्झर्लंडला हेडऑफिस असलेली. किस्सा आहे भारत आणि नोवार्तीस मधील लढ्याचा.  तर काय झालेलं, नोवार्तीसने कॅन्सर वरील एक औषध बनवलेलं आणि त्यासाठी पेटंट मिळाव म्हणून भारतात application फाईल केलेलं. कधी तर १९९७ साली. मेडिसिनच नाव Glivec. त्यांनी पेटंट फाईल केलेलं चेन्नई पेटंट ऑफिसमध्ये. त्यावेळी भारतात फार्मा प्रोडक्ट्ससाठी पेटंटची सुरक्षा भारतातर्फे दिली जात नसे. त्यामुळे बरेच दिवस ते अप्लिकेशन पेंडिंग अवस्थेत होतं आणि नोवार्तीसचा हेतूदेखील जेनेरिक मेडिसिनच उत्पादन थांबवून आपली monopoly तयार व्हावी असाच होता. आता पेटंट भेटण्यासाठी मुख्यतः तीन गोष्टींची गरज असते. १. Novelty : नवीनता २. Non Obviousness: नुसताच नवा नको, तर आधी अस्तित्वात असलेल्या औषधांपेक्षा तुमच्या औषधात जे नावीन्य आहे ते असं असावं, की औषधनिर्मितीचे ज्ञान असलेल्या कुणालाही ते सहज सुचू शकणार नाही. ३. Industrial Applicability: ते कारखा...