हल्दीघाटीची लढाई
हल्दीघाटीची लढाई किती लोकांना माहितीय ? मला वाटतंय जवळपास सर्वांनाच माहितीय.. पण मी जी आज हल्दीघाटीची लढाई सांगणारे ती आहे रिसर्च फिल्डमधील. आणि एका मराठी माणसाने दिलेल्या यशस्वी लढाईची. दुसरा किस्सा बौध्दिक संपदेचा... काळ होता १९९४-९५ च्या सुमारचा. आपल्या देशात नुकतीच बौद्धिक संपदा म्हणजेच Intellectual Property च्या संदर्भात थोडासा अवेअरनेस येऊ लागलेला. आणि त्यावेळीच १९९५ साली अमेरिकेत एक पेटंट ग्रांट झाल , संशोधक म्हणून भारतीय-अमेरिकन व्यक्ती डॉ. सुमन कोहली आणि हरिहर पी. यांनी फाईल केलेल्या पेटंट application ला मान्यता मिळून ते ग्रांट झालेलं. आता पेटंट ग्रांट झाल्यावर काही exclusive हक्क मिळतात ते एकदा पाहू आणि मग पुढे सरकू. एखाद्याला पेटंट मिळाल म्हणजेच ग्रांट झालं की त्याला मुख्यत्वे काही अधिकार मिळतात. एक म्हणजे त्या संशोधनाचा वापर कुणाला करून द्यायचा आणि कुणाला करून नाही द्यायचा यावर सर्वस्वी त्या संशोधकाचा अधिकार राहतो आणि दुसरं म्हणजे तो संशोधक हे संशोधन वापरण्यासाठी परवानगी देणे , त्याचे license देणे , त्याबाबतचे प्रोडक्शन करणे आणि ते विकणे किंवा त्यासंदर...