तेल मीठ भाकरी...
आत्ता आपलं हॉटेल आहे. जे पाहिजे ते आणि पाहिजे तसं फक्त ऑर्डर केलं की तयार होतयं आणि खायला मिळतय... आता अशी सुरुवात केली की वाटेल एखादी मोठी सक्सेस स्टोरी बिरी सांगतो का काय, पण तसं काही नाही... आपल्या घरची परिस्थिती काय एवढी खराब नव्हती... किंबहुना चांगलीच होती... आई बाप शिक्षक. त्यामुळं भरपूर व्यवस्थित म्हणल तरी चालेल. पण त्यांची परिस्थिती एकदम खराब नसली तरी फारफार तर दोन वेळचं पोटभर जेवण मिळेल एवढी बरीच होती. तर विषय काय आहे आजचा की आज आमची आक्का आठवली. आक्का म्हणजे आमची आज्जी, वडिलांची आई... आमचे वडील चौथे म्हणजे त्यांच्या आधी तिघे... त्यात तिघांची सगळी पोरं म्हणजे आमची चुलत भावंड सगळी आमच्यापेक्षा मोठीच. म्हणजे मी ह्या दुनियेत यायच्या आधी तिला दहा नातवंड अलरेडी होती... म्हणजे मोठ्या तिघांची प्रत्येकी तीन आणि आमच्या वडिलांपेक्षा लहान चुलत्याची पहिली मुलगी... अशी टोटल दहा जण... त्यामुळे ते नातवंड याबद्दलच नवीन नवीन आकर्षण वगैरे सगळं तिला जुनं झालेलं असेल... आमच्या अक्ख्या परिवारात लेडीज मध्ये आमची आई फक्त नोकरीला... मग आपसूकच शाळेला आई गेली की आमची आक्का आणि काकूच आम्हाला सांभा...