जगणं सेलिब्रेट करा...
जीवन आणि मृत्यूचा खेळ कुणाला चुकलाय... जो जन्माला आला
त्याचा मृत्यू अटळ आहेच... कुणीतरी म्हणलय की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. अजून
कुणीतरी म्हणलय की जन्म आणि मृत्यू ह्यांच्यामधला सारा खेळ म्हणजे जगणं असतं. “कुणी
काय पण म्हणाना का आपल्याला काय त्याचं”, असं म्हणत आपण आपला रोजचा दिवस काढतो, पण
काही गोष्टी आपल्याला त्यातून थोडासा वेळ काढायला कारण ठरतात. तुम्हाला वाटत असेल
की का असं बरळत बसलाय हा आज. तर किस्सा
असाय की,
अशीच एक बातमी बघण्यात आली. ४० दिवस कोमात असलेल्या
मुलाच्या शुद्धीवर येण्याची. जगण सेलिब्रेट करण्याची. जन्म झाल्यानंतर काही तासातच
हा चिमुकला कोमात गेला. बरं आई बाप गरीब, ना ऐपत ना पैसा. मोठ्या महागड्या
दवाखान्यात दाखल करण्याचा प्रश्न तिथेच मिटला आणि बाळाची रवानगी सरळ सरकारी
दवाखान्यात झाली. आपल्या इकडच्या सरकारी दवाखान्याच्या परिस्थितीचा जगात फेमस असा
स्टेट्स आहे, पण इथ वेगळच घडल.
डॉ रविंद्र रोकडे यांनी सर्व सूत्रे हातात घेत डॉ
जान्हवी भोसले यांच्या बरोबरीने उपचारास सुरुवात केली. दवाखान्यातील ICU मध्ये
बळावर तब्बल ४० दिवस उपचार करण्यात आले. ह्यात सर्वानी आपापल्या परीने मदत करत
सहभाग घेतला. एखाद्या बाळावर ४० दिवस उपचार केल्यावर तो शुद्धीवर येत असेल तर
वातावरण इमोशनल होणारच की... तो शुद्धीवर आल्याची खात्री होताच त्यावर उपचार
करणाऱ्या टीमच्या डोळ्यात पाणी आलं. कोण कुठचा एवढासा पोरगा, पण त्याने जगणं
सेलिब्रेट करायला शिकवलं सगळ्यांना...
हल्ली डॉक्टर आणि पेशंट मधील नातं हे एवढ खराबरित्या
पुढं आणलं जात असताना अशा घटनांना आपण सेलिब्रेट करायलाच पाहिजे. डॉक्टर हे देवदूत
असतात ह्यावर तुमचा विश्वास बसला पाहिजेच.
बाकी जगत राहा... जगणं सेलिब्रेट करत राहा...
© Anup Nalawade, 2019. All rights reserved. (Published at Pune on 08/01/2019)
Nice writing
ReplyDelete